शिवरायांचा जन्म व अस्थिर राजकीय स्थिति

 

  शिवरायांचा जन्म व अस्थिर राजकीय स्थिति 



 
छत्रपती शिवाजी महाराज

शिवजन्म पूर्व काळात महाराष्ट्रात अत्यंत दहशतीचे वातावरण होते. निजामशाही व

आदिलशाही आसपास लढून एकमेकांचे जीव घेत होते. त्यात बळी जात होते माराठेच.

आता हेच पाहा ना... सन 1629 ला मोगलांचाच सरदार दर्याखान रोहिला हा शाहजहान

बादशहाविरुद्ध बंद करून उठला. त्याचा पाडाव करण्या- साठी शहाजीराजांना जावे लागले;

कारण ते त्या वेळेस मोगलशाहीमध्ये सरदार होते. स्वत:च्या पत्नीला गरोदर पणी अवघ-

डलेल्या स्थितीत शिवनेरी गडावर ठेवून दर्याखानावर चालून जावे लागले. त्यामुळे मराठ्यांची

अवस्था फार वाईट होती. मोठ-मोठ्या सरदारांना सुलतानशहांच्या पुढे झुकावे लागत असे.

माराठ्यांवरील हा अन्याय व गुलामगिरी नष्ट करण्यासाठीच की काय !

शिवनेरी गडावर 19 फेब्रुवारी 1630 ला जिजाऊंच्या पोटी पुत्राचा जन्म झाला. शिवनेरी

 गडावर जन्म झाला म्हणून शिवाजी नाव ठेवले. गडावर वास्तव्यास असलेल्या सर्व लोकांना

 आनंद झाला. जिजाऊ आणि शहाजीराजे तेथे यांच्या टर आनंदाला पारावार राहील नाही.

 परंतु बाळाच्या बरशाला शहाजीराजे तेथे हजर राहू शकले नाहीत. गडाच्या परिसरातील

 खेड्यापाड्यात शिवाजीच्या जन्माची बातमी पसरली. सह्याद्री तर आनंदाने बहरून गेला

 होता. शहाजीराजांना पुत्र- प्राप्तीचा आनंद होताच, परंतु त्यांच्या मनावर युद्धमय

 परिस्थितीचे सावट होते. खुद्द शाहजहान बादशहा 1 मार्च 1330 ला बुऱ्हाणपुरात येऊन

 दाखल झाला होता.

दौलताबादला निजामशहाने आपल्या बायकोच्या हट्टाखातर मालिक अंबरचा पुत्र फत्तेखानाला

मुख्य वजीर नेमले. फत्तेखानाने वजीरी मिळताच खुद्द निजामशहा-लाच कैदेत टाकले व

नंतर त्याचा खून केला. आणि हुसेन शहजाद्याला लगेच गादीवर बसविले.

जून 1630 पासून मे 1631 पर्यंतच्या काळात महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला. लोकांना

अन्न आणि जनावरांना चार मिळणे दुरापास्त झाले. विहारी, तलाव, नद्या आटल्या. गुरे व

माणसे तडफडून मेली.

संत तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी यांनी दुष्काळाचे अत्यंत कारूणामय वर्णन केले

आहे. संत तुकारामांची तर बायको, आई व मुलगा ही तीन माणसे या दुष्काळात हे जग

सोडून गेली आणि स्वत:च्या व्यवसायाचे दिवाळे निघाले. तरी देखील संत तुकारामांनी ‘जे

झाले ते बरे झाले’ असे म्हंटले आहे.

 शहाजीराजांचे सत्तांतर : 

शहाजीराजांच्या जीवनात एक महत्त्वाचा टप्पा याच काळात येऊन गेला. इ. स. 1633 च्या

दरम्यान शाहजहान बादशहाने निजामशाही नष्ट करण्याचा निश्चय केला होता. त्याने

दौलताबाद जिंकण्यासाठी महाबतखानावर जबाबदारी सोपविली होती. शहाजीराजांनी व

आदिलशहाच्या सरदारांनी खूप शर्थीने प्रयत्न करून दौलताबादला टाकलेला वेढा तोडण्याची

शिकस्त केली; परंतु दौलताबाद हातचा निसटला व निजामशहाचा वजीर फत्तेखान व खुद्द

निजाम हुसेनशहा हे महाब-तखानाच्या तावडीत सापडले. 17 जून 1633 ला निजामशाही

बुडाली.

काहीही करून सत्ता काबीज करण्याचा शहजिराजांचा डाव होता. निजामशहा मेला तरी त्याचा

वंशज असलेल्या एक लहान मुलाला कैदेत असताना शहजिराजांनी आपल्या ताब्यात घेतले.

त्याचे नाव होते मूर्तीजा महाराजांनी त्याला सांगमनेर-जवळच्या ‘पेमगिरी’ येथे आणले.

आणि ताबडतोब समारंभ करून मूर्तीजा बादशहला स्वत:च्या मांडीवर बसवून सर्व

राज्यकारभार स्वत:च करावयाचे. या कामी आदिलशाहाने ‘मुरार जगदेव’ व रणदुल्लाखानास

शहाजीराजांच्या मदतीस पाठविले.

शहाजीराजे आदिलशाहीत दाखल :

ऑक्टोबर 1635 ला आदिलशाहाच्या विजापूरात एक भयंकर घटना घडली ती म्हणजे मुरार

जगदेवचा खून! महंमद आदिलशहाने मुरार जगदेव यास कैद करून त्याची जीभ छाटुन

शहरातून धिंड काढली व नंतर त्याचे तुकडे तुकडे केले. त्याच वेळी वजीर खवासखानाचाही

खून झाला व मुस्तफाखान वजीर बनला हा मुस्तफाखान शहाजिराजांचा खूप द्वेष करीत

असे.

शहाजीराजांचा फार मोठा आधार नष्ट झाला. राजांनी मूर्तीजा निजमशहाला घेऊन माहुलीच्या

किल्ल्याचा आश्रय घेतला. त्यावेळी त्यांनी बाल शिवाजीला व जिजाऊंनाही माहुलीला

आणले. खानजामानने माहुलीला वेढा दिला. त्याच्या मदतीला मलिक रेहान, सिद्धी मर्जान

व रणदुल्लाखान होता. रणदुल्लाखानाला शहाजीराजांच्याबद्दल आपुलकी व प्रेम होते.

राजांच्या कर्तबगारीची होत असलेली नासाडी पाहवत नव्हती.

अखेर रणदुल्लाखानाच्या प्रयत्नाने शहाजीराजांचे माहुलीच्या वेढयातून सुटका झाली, ती एका

अटीवर... शहजिराजांनी आदिलशहादरबारी रुजू व्हावे. मूर्तीजा निजामशहाला मोगलांनी

पकडले. शहाजीराजे आपल्या पत्नी जिजाऊसह गडावरुन खाली उतरले. निजामशाही

वाचविण्याचे शहाजी महाराजांचे प्रयत्न निष्फळ ठरले. आदिलशहाने शहाजीराजांची रवानगी

कर्नाटकातील बेंगलूर येथे केली. व त्यांच्यावर तेथील मुलखाची जबाबदारी सोपविली. या

वेळी शहाजीराजांच्या बरोबर जिजाऊ व बालशिवाजी होते. तेव्हा शिवरायांचे वय अवघे सहा

वर्षांचे होते.

बेंगलूरकडे जाताना आदिलशहाने शहाजीराजांची एक विनंती मान्य केली, ती म्हणजे

आदिलशहाचे प्रमुख सरदार रणदुल्लाखान यांचे आधिपत्त्याखाली असलेले कारीचे देशमुख

कान्होजी जेधे व त्यांचे सहकारी दादाजीपंत लोहकरे या दोघांना आपल्यासोबत पाठवावे. ही

विनंती मान्य झाल्याने ही शूर माणसं शहाजीराजांना प्राप्त झाली. आशा रीतीने

शहाजीराजांचा शाही सत्तांतराचा खटाटोप एकदाच संपला व विजापूरच्या आदिलशहाकडे ते

शेवटपर्यंत राहिले.

 

 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने