लांडगा आला रे, आला. छान छान गोष्टी

 

                           लांडगा आला रे, आला

एका गावात एक धनगराचा मुलगा राहत होता. तो दररोज सकाळी शेळ्या-मेंढ्या घेऊन

 माळरानावर जायचा. शेळ्या-मेंढ्या चरायला लागल्या की, तो झाडावर चढायचा आणि

 आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या लोकांकडे पाहत बसायचा. एकदा त्या मुलाला वाटले

 की,शेतात काम करणाऱ्या लोकांची गंमत करावी. तो झाडावरून मोठ्याने ओरडला, “लांडगा

 आला रे आला, धावा धावा.” वाचवा वाचवा.

त्याचा आरडाओरडा एकूण शेतातले लोक हातातली कामे टाकून मुलाच्या मदतीला धावून आले. त्यांनी

 पहिले तर लांडगा कुठेच नव्हता. ते मुलाला म्हणले, “कुठे आहे रे लांडगा?” मुलगा मोठ्या मोठ्याने

 हसत म्हणाला, “लांडगा आ लाच कुठे?” मी तुमची गंमत केली. मुलगा वात्रट आहे असे म्हणत लोक

 शेतात परतले. लोकांची आपण कशी फजिती केली, याची मुलाला मजा वाटली.


पुढे दोन-तीन वेळा धनगराच्या मुलाने त्या शेतकऱ्यांना असेच फसविले. एके दिवशी त्या माळरानावर

 खरोखरचं एक लांडगा आला होता. मुलाने मोठ्या मोठ्याने आरडाओरडा केला, “लांडगा आला रे

 आलाऽऽ"


लोकांना वाटले कि, हा मुलगा नेहमीप्रमाणे आपली फजिती करत असेल म्हणून मुलाच्या मदतीला

 एकही माणूस धावून आला नाही. त्या लांडग्याने एक-एक करून सर्व शेळ्या-मेंढ्या खाऊन टाकल्या.



धनगराचा मुलगा झाडावर बसून हताशपणे हे सर्व पाहत राहिला.

                         तात्पर्य: खोटेपणाबद्दल शिक्षा मिळते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने