मुंगी आणि कबुतर यांची गोष्ट

        



        मुंगी आणि कबुतर यांची गोष्ट 

एकदा एक मुंगी नदीच्या किनाऱ्यावर फिरत असताना नदीत पडली

 आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत दूर जावू लागली.

 तिच्या जीवावर आलेले संकट पाहून झाडावरील एका कबुतराने

 जवळचे एक पान तोडले. व त्या मुंगी समोर पाण्यात टाकले.

आधार सापडताच ती मुंगी कबुतराने टाकलेल्या

 त्या पानावर चढली व त्या सहाय्याने सुरक्षितपणे नदीच्या बाहेर आली.                                      काही दिवसांनी एक शिकारी पक्षांना पकडण्यासाठी साधने घेऊन नदीच्या तीरावर आला, त्याने झाडावर बसलेल्या त्या कबुतराला मारण्यासाठी बंदुकीने नेम धरला. हे मुंगीने पाहताच, ती मुंगी त्या शिकाऱ्याच्या पायाला कडकडून चावली आणि त्याच्या बंदुकीचा नेम चुकला. त्यामुळे सावधान होऊन काबुतरही तेथून भुर्रकन उडून गेले.

          तात्पर्य : आपण लोकांना केलेली मदत कधीच वाया जात नाही

मुंगी आणि कबुतर ही गोष्ट कशी वाटली gossips 360 वर कमेंट करून सांगा. 

Also read : छान छान गोष्टी मराठी 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने