संत नरहरी सोनार , (संतांची ओळख)

 

                

 

संत नरहरी सोनार

पंढरपुरात नरहरी सोनार म्हणून एक शिवभक्त राहत असे. तो मल्लिकार्जुनाची पूजा-अर्चा

 करी. तो पांडुरंगाला मानीत नसे. त्याला त्या श्रीहरीचा इतका तिटकारा होता कि तो

त्याच्या देवळाच्या शिखराकडेही पाहत नसे.एके दिवशी एका सावकाराने पांडुरंगाला ‘मला 

 मुलगा झाला तर मी तुला सोन्याचा रत्नजडीत करदोडा देईन,’ असा नवस केला. पुढे

 त्याला मुलगा झाला व नवस फेडण्यासाठी तो पंढरपुरास आला.त्याने पुजाऱ्याकडे

सोनाराची चौकशी केली असता त्याला नरहरीचे नाव समजले. त्याप्रमाणे तो नरहरीस

 भेटला आणि त्याला हिरे, रत्ने व सुवर्ण देऊन करदोडा बनविण्यास सांगितले. नरहरीने

 त्याला पांडुरंगाच्या कमरेचे माप आणण्यास सांगितले. सावकाराने पांडुरंगाच्या कमरेचे

माप आणले व नरहरीने स्वर्णमेखला बनविली. ती तयार झाल्यावर सावकाराने पांडुरंगाची

पूजा करून ती विठ्ठलाच्या काटीभोवती बांधण्याचा प्रयत्न केला, पण ती लहान झाली.

त्याने नरहरीकडे जाऊन ती वाढवून आणली, तर ती मोठी झाली. अशा प्रकारे ती मेखला

 कधी लहान तर कधी मोठी होऊ लागली. सावकाराने नरहरीला स्वत:येऊन देवाच्या

कटीचे माप घे, अशी विनंती केली. नरहरी म्हणाला मी शंकराशिवाय अन्य देवाचे दर्शन

घेत नाही.  पण सावकारच्या आग्रहास्तव आपले व्रत मोडू नये म्हणून डोळे बांधून

 पांडुरंगाच्या देवळात गेला. त्याच्या वेडेपणाला लोक हसत होते, पण त्याला त्याची पर्वा

 नव्हती. गाभाऱ्यात गेल्यावर नरहरीने पांडुरंगाची मूर्ती आपल्या हातांनी चाचपून पाहू

 लागला. तेव्हा ती मूर्ती आपल्या आराध्यदैवताची-शंकराची आहे असे त्याला जाणवले.

 त्याने आश्चर्याने डोळ्यावरील पट्टी काढून पहिले तर पांडुरंगाची सावली मूर्ती समोर उभी

 दिसली. त्याने पुन्हा डोळे झाकले व मूर्ती चाचपून पहिली तर ती शंकराचीच आहे असे

 जणवले. त्याने पुन्हा डोळे उघडले तर समोर पांडुरंगमूर्ती! तो चमत्कार पाहून नरहरीने

 पांडुरंगाचे दर्शन घेतले. शिव आणि श्रीहरी असा भेदभाव केल्याबद्दल त्याला पश्चाताप

 वाटत होता. त्याने पांडुरंगाची क्षमा मागितली.पांडुरंग प्रसन्न होऊन म्हणाले, ‘नरहरी! तू

 मला अतिशय प्रिय आहेस. मी आणि शंकर एकरूपच आहोत. तुला हरीहरांचे ऐक्य

 दाखविण्यासाठीच मी हि लीला केली. तेव्हापासून नरहरीच्या समाधानासाधी पांडुरंगाने

 आपल्या मस्तकी शिवलिंग धरण केले.


   देवा तुझा मी सोनार | तुझ्या नामाचा रे व्यवहार|| 

    तुम्हाला संत शिरोमणी नरहरी महाराज यांची माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून

 सांगा. 

 धन्यवाद.                

1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा
थोडे नवीन जरा जुने